Share

“…तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल”, नाणार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

Published On: 

सिंधुदुर्ग: नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता असून गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला. मात्र आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांनी म्हटले. यावरच शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

” हा एक वेगळा विषय आहे. स्थलांतरित करण्याचा विषय आहेच पण दुसरीकडे न्यायचा तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करुन, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच हायवे, रस्ता किंवा कोणताही मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक लोकांना, भुमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार. एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता ठाकरे सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे धर्मेद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!