Share

‘विदेशात लस दिल्याने आपल्याकडे कमतरता’, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुरेसा लसपुरवठा न झाल्याने लसीकरणाला अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘सुरुवातीला टप्प्यात तयार होणारी लस इतर देशांना देण्याची गरज नव्हती. त्यांना लस दिल्याने आपल्याला लसींची कमतरता भासत आहे’, असे पवार म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात विधान भवन येथे पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

पुण्याला प्लांट म्हणून आपल्याला जास्त लस पाहिजे
राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान निश्चित लसीचा अधिकाधिक पुरवठा केला जाईल असे त्यावेळी सांगितले गेले. पण नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने, आपल्यालाच अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे’ अशी भूमिका पवार यांनी मांडली.

कुंभमेळ्यामुळे रुग्णसंख्या वाढली
पवार म्हणाले, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर राज्य सरकारचे लक्ष आहे. सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!