मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. यावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कालचं मुखमंत्र्याचं भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या. ना कोणती उत्तरं ना कोणती दिशा. १२ कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना, पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? पाच लाख लसी महाराष्ट्रात दिल्याच नाहीत, मग तरी त्याची घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का तो कूछ पता नहीं हे या राज्य सरकारचं वैशिष्ट्य आहे’ असे उपाध्ये म्हणालेत.
मदत होत आहे, कामे केली जात आहेत, अशी सगळी भाषा या लाईव्ह मध्ये होती. पण राज्यात १० लाख लसीकरणाची क्षमता आहे तर सांगितली का नाहीत? कितीहज़ारांमागे केंद्र उभी केली, त्यांचीयादी, लस देण्यासाठी काययंत्रणा उभी केली आहे? १८ते४४ मध्ये परत वयाच्याअटी टाकणार की नोंदविल त्याला लस देणार?..3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 1, 2021
उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना काही सवालही केले आहेत. ‘राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे, तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली, त्यांची यादी, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नाव नोंदविलं त्याला लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांचे उत्तर दिले नाही, कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे. १२ कोटी लसी देण्यासाठी एक रकमी चेक देणारे. इथल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेत काम करण्याऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत’ अशी टीका उपाध्ये यांनी केली.
महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेमडेसीवर व आँक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 1, 2021
दरम्यान, कालच्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले होते की, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय. शनिवारी पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या. असे आवाहन ठाकरेंनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपणच जबाबदार’, मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
- मैत्रीच्या नात्याला काळिमा! फोटो डिलिट करण्याच्या बहाण्याने बोलावून मित्राच्या पत्नीवर अत्याचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

