Share

एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार

Published On: 

बुलडाणा : लग्न म्हटलं की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात अन पती पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन दोघेही सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. अशात याच नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली तर ती असह्य होते. असाच एक प्रकार मलकापूरमध्ये घडलाय.

लॉकडाऊनमुळे मंदिरातच एकमेकांच्या गळ्यात माळा घालून लग्न लागले. त्यानंतर सर्वजण आनंदाने घरी परतले. मात्र, सायंकाळी शौचाला जाते असं म्हणत बरोबर आलेल्या करवलीसोबत नवऱ्या मुलीने पलायन केले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकात घडणारा हा प्रकार २७ एप्रिल रोजी मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे घडला. यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या नवरदेवाने व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काही दलालांनी तर लुबाडणूकही करायची आणि लग्नाचे नाटक करून नवरीला फरार करण्याचे उद्योगही सुरू केले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. येथील एक युवक त्याच्या कुटुंबीयांना दलालाने उपवर मुलगी दाखविली. तातडीने लग्नाची तारीखही ठरविण्यात आली. २७ एप्रिल रोजी गावापासून काही अंतरावरील मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकला.

वर-वधुने एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. यानंतर सर्वजण आनंदाने घरी परतले. नवरी सोबत एक महिला करवली म्हणून आली होती. मात्र, संध्याकाळी सात वाजता नवरी व सोबतची महिला शौचास जाण्याच्या बहाण्याने फरार झाली. या प्रकाराने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!