जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. तो वाद शमला नाही की शिवसेनेचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. पण यावेळी वैयक्तिक आरोप नव्हे तर कोरोना लसीकरणावरून पाटील यांनी महाजनांना डिवचलेय.
‘पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा राज्यासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकात सत्कार करीन”, असे आव्हान गुलाबराव पाटील यांनी महाजनांना दिलं आहे.
जर राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीश भाऊंना माहिती आहे. जर लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही’, असे पाटील म्हणाले. यावर गिरीश महाजन काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘..मग इतक्या दिवस तुम्ही काय केले?’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे भुलभुलय्या’, भाजपचा टोला
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

