मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कबूल केले. पण या संकटाचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय केले हे सांगितले नाही. तुम्हाला जर माहिती होते की दुसरी लाट येणार आहे, तर मग तुम्ही इतक्या दिवस काय केले असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
काल शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून भाजपकडून चांगलाच समाचार घेण्यात येतोय. पाटील म्हणाले, ‘रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील. पण हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते, तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती.
‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे भुलभुलय्या’, भाजपचा टोला
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपणच जबाबदार’, मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

