नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनअभावी शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आज बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात उमटत आहेत. एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आज हायकोर्टाने केंद्र सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत.
"Water has gone above the head. Now we mean business. You (Centre) will arrange everything now, "the court said.
The Delhi High Court has listed the matter for further hearing on Monday.
— ANI (@ANI) May 1, 2021
‘आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आम्हाला तत्काळ अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवा’ असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिले आहेत. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा देखील सल्ला दिला.
HC directs Centre Govt Counsel Amit Mahajan to forthwith take up the matter with the officers of central government on supply of oxygen from Linde and others.
Multiple hospitals tell HC that their supplier Linde Air is not providing the oxygen.
— ANI (@ANI) May 1, 2021
दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ऑक्सजन पुरवठ्याअभावी ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा देखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे.
‘केंद्र सरकारला निर्देश देतो की त्यांनी काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याची जबाबदारीही केंद्राचीच आहे. २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस दिल्लीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा जास्त ऑक्सिजन मागत नाही. जर तुम्ही आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही सोमवारी तुमचं विश्लेषण ऐकू”, अशा कडक शब्दांत न्यायालयाने फटकारले.
महत्वाच्या बातम्या
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपणच जबाबदार’, मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
- मैत्रीच्या नात्याला काळिमा! फोटो डिलिट करण्याच्या बहाण्याने बोलावून मित्राच्या पत्नीवर अत्याचार
- धक्कादायक! रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोरोना बळीच्या खिशातील पैसे काढले, पाच जणांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

