🕒 1 min read
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाथा भाऊंच्या भारतीय जनता सोडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथा भाऊंनी भारतीय जनता पार्टी सोडल्यानंतर ही आमच्या मनामध्ये आदरच आहे.
तसेच भारतीय जनता पार्टी सोडण्यापर्यंत मी त्यांना आग्रह करत होतो, पार्टीमध्ये राहून जे काय आहे ते पदरात पाडून आपण पार्टीचे नुकसान न करता पुढे गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव येथे दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आहे. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की आम्ही जसं नाथाभाऊ पार्टी सोडून गेले तरी टीकाटिप्पणी नाथाभाऊ वरती करत नाही, तसं त्यांनी हे पथ्य पाळले पाहिजे, नाथा भाऊंना जे योग्य वाटेल ते करतील असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊ ना लावला आहे.
महत्वाच्या बातम्या –


