🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपांची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची सरबत्ती सुरु आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या आरोपांनंतर ईडी, आयकर विभागाने याची दखल घेत संबंधित मंत्र्यांवर कारवाई केली, तर कोणाला समन्स बजावले तर कोणाच्या निकटवर्तीयांच्या कारखाने, कार्यालयांवर छापे मारले.
सोमय्या अनेकांचे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, उपमुख्यमंत्री अजित पवार, बजरंग खरमाटे, अनिल देशमुख, भावना गवळी अशा बड्या नेत्यांना सोमय्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. आता त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
ठाकरे सरकारनी मंत्री हसन मुश्रीफचे जावई मतीन मंगोली, जयोस्तुते मेनेजमेंट कंपनी ला दिलेला १५०० कोटींचा कॉन्ट्रॅक्ट आत्ता रद्द केला आहे. आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले की ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
ठाकरे सरकारनी मंत्री हसन मुश्रीफचे जावई मतीन मंगोली, जयोस्तुते मेनेजमेंट कंपनी ला दिलेला ₹१५०० कोटींचा कॉन्ट्रॅक्ट आत्ता रद्द केला आहे.
आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले
ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार@BJP4Maharashtra pic.twitter.com/hxKu33JjhO
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
- याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
