Share

शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे – हसन मुश्रीफ

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.

यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं’. असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

तर, सरकार स्थापन होत असताना असा काही करार झालाय का एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, वगैरे, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ म्हणाले, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे’.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!