Share

‘हमने तो जलने का हुनर भी तुफानों से सीखा है’, आनंद महिंद्रांची कोरोना योद्ध्यांना अनोखी सलामी

Published On: 

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विट्समुळे लोकप्रिय ठरत आहेत.आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर आतापर्यंत ८४ लाख लोकांनी फॉलो केले आहे. विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे त्यांचे ट्विट्समुळे माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते.

देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक होत आहे. पण तरीही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी आजही धोकादायक आणि गंभीर परिस्थितीत आपले कर्तव्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याला आता महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“वो कोई और चिराग होते है जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…” असं ट्विट यांनी केलं आहे. त्यासोबतच “अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!”, असं देखील त्यांनी म्हटलंय.

यापूर्वीही महिंद्रा यांचे अनेक ट्विट चर्चेत राहिलेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्याआधी आनंद महिंद्रा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले होते. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते, याची आठवण महिंद्रा यांनी ठाकरेंना करून दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!