Share

राजकीय सुडबुद्धिने अनिल देशमुखांच्या घरावर धाड, मंत्री विश्वजीत कदमांचा आरोप

Published On: 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली होती. ही कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्र आहे. केंद्रातील सत्ताधारी तपास यंत्रणेच्या गैरवापर करीत आहेत, असा आरोप कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केला. ते सांगलीत बोलत होते.

मंत्री कदम म्हणाले, ‘सीबीआय’चा वापर राजकारणासाठी करणे हे लोकशाहीला मारक आहे. या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची बाब आता लपलेली नाही. देशमुख यांच्याबाबत जे काही प्रकार सुरू आहेत ते चुकीचे आहेत, सत्य काय आहे ते बाहेर येईल. या यंत्रणेचेही सत्य लोकांसमोर निश्चितपणे येईल. केंद्रातील सरकारने या यंत्रणांचा गैरवापर थांबवावा. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील परिस्थिती समजून घेऊन योग्य ती मदत करावी.

दरम्यान, पोलीस अधिकारी सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख होते. तर मग देशमुखांचा धनी कोण, असा सवाल करत अप्रत्यक्षरीत्या नाव न घेता राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला शरसंधान केले. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका गाडीत स्फोटके ठेवण्यात आली होती. याप्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना क्लीन चिट दिल्याबाबत पडळकर यांनी आक्षेप नोंदवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!