🕒 1 min read
मुंबई : व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचा ६१ वा वर्धापन दिन दि.१३ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डरायचं नाही तर फक्त लढायचं असा कानमंत्र दिला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,’मराठी माणसाला कोणी आळशी म्हणत असले तरीही मराठी माणूस लढ्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाही. जर का अन्याय होत असेल तर अन्याय करणारा कितीही मोठा असेल तरी त्याच्या छाताडावर वार करण्याची हिंमत मराठी माणसाने पिढ्यान् पिढ्या दाखविली आहे आणि ती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
दरम्यान,यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, ‘नोकरी सोडा आणि व्यवसाय करा हे सांगणे खूप सोपे आहे, परंतु करायला खूप कठीण आहे. मात्र, ते सुद्धा शिवसेनाप्रमुखांनी करून दाखवले. फ्री प्रेसमधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. ते देखील व्यंगचित्र साप्ताहिक. त्यांचा हा निर्णय मोठा धाडसाचा होता. तसेच १३ ऑगस्ट १९६० साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘मार्मिक’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.त्यानंतर अनेक समस्यांना तोंड देत मार्मिक इथपर्यंत पोहोचले आहे असे देखील सुभाष देसाई म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण


