Share

संभाजी राजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहित नाही – रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज पवई मध्ये पार पडला. या मेळाव्याला देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष  रामदास आठवले उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजेंना दिलेला शब्द पाळला नाही असं विधान संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. यावर आता रामदास आठवलेंनी या मेळाव्यात प्रतिक्रिया दिली आहे.

“संभाजी राजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहित नाही. शब्द जर दिला असेल तर उद्धव ठाकरे यांनी तो पाळायलायला हवा होता. परंतु संभाजी राजे हे देखील बीजेपीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी बीजेपीला सोडून विचार करणं अत्यंत अयोग्य होते. बीजेपी सोबत राहायला पाहिजे होत. परंतु संभाजी राजेंनी असा निर्णय घेतला आणि शिवसेनेने त्यांना शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणे आहे, दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं याची आम्हाला कल्पना नाही संभाजी राजे यांनी बीजेपी पासून दूर जायला नको होते”, असे रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!