Share

IPL 2022 Final GT vs RR : पावसानं घोळ घातला तर मॅचचं काय होणार? वाचा…

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा अंतिम सामना आज २९ मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. गुजरातने क्वालिफायर १मध्ये राजस्थानचा पराभव करून थेट फायनलमध्ये प्रवेश केला. तर राजस्थानने क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. आयपीएलच्या या मोसमात गुजरातने पदार्पण केले, तर राजस्थानने स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरी धडक दिली आहे. सर्वांनाच आजच्या सामन्याची उत्सुकता आहे. पण भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे आज पाऊस आला तर मॅचचे काय होणार?

चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र हवामानामुळे उत्साह बिघडू शकतो, अशी भीतीही चाहत्यांना वाटत आहे. अंतिम सामना रात्री ८ वाजता होणार आहे. खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाल्यास सामना रात्री १०.१० वाजता सुरू होऊ शकतो. विशेष म्हणजे दोन तास उशिराने सामना सुरू झाल्यानंतरही षटके कमी केली जाणार नाहीत. जर काही कारणास्तव अंतिम सामना ५-५ षटकांचा असेल तर सामना जास्तीत जास्त रात्री १२.२६ मिनिटांपर्यंत सुरू करावा लागेल. फायनलच्या दिवशी खराब हवामानामुळे एकही चेंडू टाकता आला नाही, तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

नवीन नियमानुसार, जर आयपीएल २०२२चा अंतिम सामना पावसामुळे मध्येच थांबवावा लागला, तर दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळ जिथे थांबला होता तिथून सामना सुरू होईल. नाणेफेकीनंतर खेळ थांबवला गेला आणि एकही चेंडू टाकला गेला नाही तर नाणेफेक पुन्हा राखीव दिवशी घेतली जाईल. त्याचवेळी राखीव दिवशीही पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यास सुपर ओव्हरचा वापर केला जाईल आणि पावसामुळे सुपर ओव्हर शक्य नसेल तर पॉइंट टेबलमध्ये आघाडीवर असलेला संघ विजेता होईल. गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!