Share

IPL 2022 Final GT vs RR : काही तासांतच मिळणार चॅम्पियन..! ‘अशी’ असू शकते फायनलसाठी दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा अंतिम सामना आज संध्याकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. गुजरातचा हार्दिक पंड्या आणि राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन यांना कर्णधार म्हणून आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवायचे आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाने २००८ साली दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर गुजरात टायटन्सचा हा पदार्पणाचा हंगाम आहे. हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरा ही जोडी पहिल्या हंगामाच्या अंतिम फेरीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

या सामन्यात राजस्थानचा जोस बटलर आणि गुजरात टायटन्सचा डेव्हिड मिलर यांच्यावर सर्वाधिक नजरा असतील. दोन्ही खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. त्याचबरोबर राजस्थानचा युजवेंद्र चहल आणि गुजरातचा राशिद खान लेग स्पिन गोलंदाजीत आपली अप्रतिम फिरकी दाखवतील.

दोन्ही संघांची संभाव्य Playing 11

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!