Share

IPL 2022 Final GT vs RR : कोण जिंकणार फायनल? ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनानं दिलं ‘हे’ उत्तर!

Published On: 

मुंबई : आज रात्री आयपीएल २०२२ (IPL 2022)चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ पासून हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटू आणि मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाने मोठे वक्तव्य केले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुरेश रैना म्हणाला, “गुजरात टायटन्स अंतिम सामन्यात वर्चस्व राखण्यासाठी चांगल्या स्थितीत असेल. मला वाटते की अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला राजस्थान रॉयल्सवर थोडीशी कुरघोडी करण्याची संधी मिळेल. कारण टायटन्सचा संघ ४-५ दिवस विश्रांती घेत आहे. या मोसमात गुजरातने ज्या प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांची स्थिती चांगली आहे. मात्र, जोस बटलरपासून सावधान राहावे लागेल.”

”राजस्थानला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. कारण राजस्थान रॉयल्सचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. मोसमातील शेवटच्या सामन्यात बटलरने चांगली कामगिरी केली, त्यामुळे तो संघासाठी मोठा बोनस असेल. अहमदाबादची विकेट उत्कृष्ट राहिली आहे. येथे फलंदाजांचे मोठे फटके पाहिले”, असेही रैना म्हणाला.

राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर-२ मध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा केल्या होत्या. विजयासाठी दिलेले १५८ धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने ३ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात जोस बटलरने १०६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ४ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!