उस्मानाबाद : संसदरत्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संत गोरोबाकाका कुंभार समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर कै रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तु संग्रहालय अस्तेवाईकपणे पहाणी केली. यानंतर या संग्रहालयाबाबद त्यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
जागतिक स्थरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगीतले. तसेच मंदीराच्या विकासासाठी अजीतदादा व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न करू असा शब्दही दिला.