Share

शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही – संजय राऊत

Published On: 

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची होती, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी केला आहे. यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत शाहू छत्रपतींच्या भेटीसाठी थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

“आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजी राजे यांना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रयत्न फसला आहे, अशी टीका भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक नाते आहे. काल त्यांनी घेतलेली भूमिका पाहून कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही प्रामाणिकपणा आणि शाहू घराण्याची परंपरा कायम असल्याचे संजय राऊत म्हणाले”.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!