Share

‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’

Published On: 

मुंबई : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.

अशातच, औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. तर, राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे.

त्यामुळे, नामकरणाचं राजकारण सोडून हिंमत असेल तर सत्ताधाऱ्यांनी संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढावा असं खुलं आव्हान मनसेतर्फे देण्यात आलं आहे. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे म्हणाले, ‘संभाजीनगर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनापासून इच्छा आहे.

आता मनसेच्या या आव्हानाला शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘औरंगाबाद शहराचं नामकरण 26 जानेवारीपर्यंत करुन दाखवा नाहीतर असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं आहे. पण त्यांचे असे बरेच नाहीतर आम्ही बघितले आहेत. अशा धमक्यांना भीक घालत नाही. संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून संभाजीनगर असंच म्हणतो. राजकारणासाठी हा विषय उकरुन काढणं हा वेगळा विषय आहे. पण पूर्वीपासून भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत’ असं ते म्हणाले.

‘ती ताकद आता शिवसेनेत राहिलेली नाही, कारण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत’

‘संभाजीनगर करण्याची ताकद ही बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. ती आता शिवसेनेत राहिलेली नाही कारण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. फलक तोडून काय साध्य करायचं आहे? वातावरण दूषित करू नका’ असा इशाराच मनसेतर्फे सुहास दाशरथे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!