Share

“राजा इतकाही फकीर निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात घालून फिरेल”

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आणलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून थंडीत हे आंदोलन शेतकरी करत आहे.दरम्यान, ठोस प्रस्ताव दिला तरच चर्चा केली जाईल, अशी ठाम भूमिका घेत शेतकरी संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारवरील दबाव वाढवला.

तीन कृषी कायद्यांमधील दुरुस्त्यांचा शेतकऱ्यांनी नाकारलेला प्रस्ताव पुन्हा देऊन सरकार वेळकाढूपणा करत आहे. तसेच, आंदोलनात सहभागी न झालेल्या शेतकरी संघटनांशी चर्चा करून शेतकरी आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप संयुक्त किसान मोर्चाने केले.

या दरम्यान माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी या कायद्याला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर हल्लाबोल केला आहे. “राजा इतकाही फकीर निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल,” अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दरम्यान, आज खासदार राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतात, हे शेतकऱ्यांना माहीत आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलक शेतकरी घरी परतणार नाहीत, ही गोष्ट पंतप्रधान मोदींनी लक्षात घ्यावी. सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन घेऊन नवे कायदे रद्द करावेत,’ असं राहुल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!