Share

…नाहीतर विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

अशातच, राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे.

त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व युवक वर्गाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी मदत होणार आहे.

मात्र, यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली आहे. ‘सरकारला मी पहिल्यापासून सांगतो आहे की आपण मराठा समजासाठी EWS चं आरक्षण दिलं तर त्यामुळे SEBC ला धोका निर्माण होऊ शकेल का? त्यापेक्षा सुपरन्युमररीचा पर्यायही मी सरकारला दिला होता. कोर्टाने यापूर्वी एका प्रकरणात निकाल दिला आहे की, जर EWSचं आरक्षण घेतलं तर SEBCचं आरक्षण घेता येणार नाही, असं सरकारी वकील पटवालिया वकिलांनी मला सांगितलं असल्याचा दावा संभाजीराजेंनी केला आहे.

संभाजीराजेंच्या या शंकेवर राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंना केला आहे. तसेच, र्वांना विश्वासात घेऊनच EWSचा निर्णय घेतला गेला आहे. मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता यावं यासाठीच राज्य सरकारने तत्परतेने हा निर्णय घेतला असल्याचा खुलासा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!