Share

‘मेटेंना सामान्य ज्ञान हवं; मागासवर्गीयांसाठी पुढाकार घेणं म्हणजे इतरांना विरोध असं नाही’

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. तर, 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समनव्यक बैठकीमध्ये मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान दिलं आहे.

मेटेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. मराठा समाज ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल विनायक मेटे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

मेटेंच्या या प्रश्नांवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘जी भूमिका दलित व मागासवर्गीयांसाठी काँग्रेसने घेतली आहे, त्यांच्यासाठी कायदे केले आहेत त्याच्या समर्थनार्थ भाजप आहे का हे मेटेंनी भाजपला विचारावं’ असा सल्ला सावंतांनी दिला आहे. दलित व मागासवर्गीय समाजासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं संविधानामध्ये देखील सांगितलं आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे का याचं देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘विनायक मेटे विधानपरिषदेत भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाला आधी मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत विचारावं. मराठा समाजाबाबत काँग्रेसने काय  भूमिका घ्यावी हे विनायक मेटेंकडून शिकण्याची गरज नाही. मेटे स्वतःच पद आणि राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करतायत. त्यामुळे असे प्रश्न त्यांनी नरेंद्र मोदी व फडणवीसांना विचारावेत. कुठल्या समाजाबाबत मागणी केल्याने दुसऱ्या समाजाचा विरोध कधी होत नसतो. त्यामुळे इतकं सामान्य ज्ञान असण्याची मेटेंना आवश्यकता आहे.’ असा घणाघात सचिन सावंत यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेतून केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!