Share

कोरोना फक्त रात्रीचाच असतो का? असं विचारणाऱ्यांची मला कीव येते; परबांचा मनसेला खोचक टोला

Published On: 

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा नाईट कर्फ्यू ५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, या नाईट कर्फ्यूवर विरोधकांनी मात्र जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपपाठोपाठ मनसेने देखील या संचारबंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘कोरोना फक्त रात्रीचा फिरतो असं मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगून गेलाय का?’ असा सवाल करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. कोरोना फक्त रात्री होतो, दिवस होत नाही का? नाईट कर्फ्यू मगच नेमकं कारण काय? असे प्रश्नच त्यांनी उपस्थित केले आहेत.

आता त्यांच्या या प्रश्नांना शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. मी तर असं म्हणतो, सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून द्यावं की कोरोनाचा फैलाव होणारच नाही. मग विचार करता येईल की, रात्री किंवा दिवसा काय करायचं ते. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावलं लोकांच्या काळजीसाठी आणि लोकांच्या हिताची आहेत.’ असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!