Share

Shahajibapu Patil | “आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र…” ; शहाजीबापू पाटलांचे वक्तव्य

Published On: 

सांगली : राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती, हे सुद्धा विसरता येणार नाही असेही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत, असं सांगून शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी आमच्या सोबत येण्याची शक्यता ही पाटील यांनी यावेळी वर्तवली. उध्दव ठाकरे आणि आताच्या सरकारमध्ये जमीन आसमानचा फरक असून, महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना होत आहेत, अस ही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!