Share

‘बटाटा-टोमॅटोचे भाव तपासण्यासाठी आपण राजकारणात आलो नाही, तर…’ – पंतप्रधान इम्रान खान

Published On: 

🕒 1 min read

पाकिस्तान : पंजाब प्रांतातील हाफिजाबाद शहरात एका राजकीय सभेला संबोधित करताना, पंतप्रधान इम्रान खान यांनी संताप व्यक्त केला आहे. म्हणाले, ‘बटाटा-टोमॅटोचे’ भाव तपासण्यासाठी आपण राजकारणात आलो नाही. देशातील तरुणांच्या हितासाठी मी सामील झालो, 25 वर्षांपूर्वी देशातील तरुणांच्या हितासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला’. असे सभेमध्ये आपले मत मांडत आक्रमक टीका केली आहे.

तसेच इम्रान सरकारच्या उर्वरित काळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे, असेही ते म्हणाले. जर आपल्याला महान देश घडवायचा असेल तर आपल्याला सत्याला सामोरे जावे लागेल आणि हेच मी गेल्या 25 वर्षांपासून सांगत आहे. इम्रान खान यांच्या भाषणाच्या काही दिवस आधी संयुक्त विरोधी आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव यशस्वी करण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्यासाठी नॅशनल निवडणूकातील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आज भेटणार असल्याचे खान म्हणाले.

विरोधकांवर निशाणा साधत, इम्रान खान यांनी आपल्या भाषणात जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल प्रमुख मौलाना फजलुर रहमान, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ सुप्रीमो नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ यांच्यावर टीका केली. तसेच म्हणाले ‘सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भ्रष्ट आणि दोषी राजकारण्यांना रोखण्याची जबाबदारी सरकार आणि न्यायव्यवस्थेची आहे. आणि जे त्यांना पंतप्रधान पदावरून हटवू पाहत आहेत ते त्यांच्याच कारस्थानाला बळी पडतील. असेही बोलत आक्रमक टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!