मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
तर, साताऱ्यात प्रकाश आंबेडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातून त्यांच्या वक्तव्यावर संताप ब्यक्त होत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. “राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील.” असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले असून हा वाद अधिक वाढत आहे.
राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 9, 2020
प्रकाश आंबेडकरांची छत्रपतींच्या वंशजांवर टीका-
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे व संभाजीराजे यांच्या भूमिकेवरून बोचरी टीका केली होती. “दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं” असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
- लाॅकडाऊनमध्येही अण्णा हजारे थांबले नाहीत; हे केले महत्त्वाचे काम!
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
- छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक कधी होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

