नवी दिल्ली- काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत सरकारला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. भारताला स्विस बँकेतील भारतीय नागरिकांच्या खात्यांच्या तपशिलाचा दुसरा संच मिळाला आहे. त्यामुळे या बँकेत कथितरीत्या दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल टॅक्स अ;ॅडमिनिस्ट्रेशनने शुक्रवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात भारताला AOEI अंतर्गत २०१९ मध्ये स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती. यामध्ये ७५ देशांचा समावेश होता. यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल ३१ लाख खात्यांचा समावेश असल्याचे म्हटले होते. परंतु स्पष्टपणे यात भारताचे नावं नव्हते. स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
आता स्विस बँकेने खातेधारकाचे नाव, खात्यातील आर्थिक व्यवहार, धनको-ऋणको, पत्ता, निवासाचा देश, कर परिचय क्रमांक, खात्यावरील जमा रक्कम आणि भांडवली उत्पन्न हा तपशील दिला आहे. भारत सरकारला मिळालेल्या या माहितीच्या आधारे काळ्या धनाविरूध्दची मोहिम तीव्र करता येणार आहे.
स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ;ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडच्या मते, भारतासह ८६ देशांसोबत ३१ लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी स्वित्झर्लंडनं सप्टेंबर २०१९ मध्ये भारतासह ७५ देशांना याबाबत माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- …म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला
- मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे; कुणी अपमान करत असेल तर …
- ‘आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल’


