पुणे- राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.
तर, मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून लढणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलताना अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत नाही असे सदावर्ते म्हणाले होते. यावर मराठा समाजाने आक्रमक पावित्रा घेतला होता. छत्रपती घराण्याच्या वंशजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलं आहे.
सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी सदावर्ते अडचणीत आले आहेत. अमर रामचंद्र पवार असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यकीचे नाव आहे. त्यांच्यावर कलम 153(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर आज अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी काल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
- मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे; कुणी अपमान करत असेल तर …
- ‘आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल’


