Share

लाॅकडाऊनमध्येही अण्णा हजारे थांबले नाहीत; हे केले महत्त्वाचे काम!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाउन करण्यात आले होते. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व देश घरात बंद झाला होता. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यामातून देशातीलच नव्हे, तर थेट देशाबाहेरील जनतेबरोबर तसेच आपल्या कार्यकर्त्यांशी विविध विषयावर सवांद साधला आहे.

अण्णा हजारे यांनी लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध राज्यात व देशाबाहेरही सुमारे १२ ठिकाणी ऑनालाईन परिसंवाद घेतले आहेत. त्यातील एक परिसंवाद ऑस्टेलियामधील विद्यापीठात झाला आहे.

सर्व जग लॉकडाऊनमध्ये बंदीस्त झाले होते तरीही अण्णा हजारे मात्र आपल्या दहा बाय दहाच्या खोलीतूनही देशातील व जगातील जनतेशी संवाद साधत  आहेत. राळेगणसिद्धी येथे २२ मार्चला ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन लॉकडाऊन जाहीर केले. गावाबाहेरील पर्यटकांना गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईपर्यंत गावात येण्यास बंदी घालण्यात आली होती.

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी परदेशातील ऑस्टेलियामधील ऑस्टेलिया युनिर्व्हसिटी मधील मुलांसमवेत ग्राविकास या विषयावर सुमारे दीड तासाहून अधिक काळ संवाद साधला आहे. तसेच मुंबईच्या गुरूकुल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी अण्णांचे जीवन कार्य व प्रेरणा या विषयावर परिसंवादात झाला आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युथ पार्लमेंट, राज्यस्थानमधील गोरखपूरच्या कार्यकर्त्यांशी, त्याचबरोबर छतपूर (मध्यप्रदेश), पुण्याच्या स्वामी विवेकानंद केंद्रात, आदर्शगाव पिंपलांत्री (राज्यस्थान ), अमरावती महाविद्यालय, देशभरातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालये आदी ठिकाणी झालेल्या परीसंवादातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

अण्णा हजारे यांच्या माध्यामातून देशालाच नव्हे, तर जगाला जलसंधारणाचे महत्व समजले आहे. प्रत्येक महिन्याला हजारो किलोमिटरचा प्रवास करणारे हजारे यांचा प्रवास गेली आठ महिने थांबला असला तरी त्यांचे मार्गदर्शन व परिसंवाद सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!