🕒 1 min read
पुणे- राज्याभरात कोरोना जोर अजूनही कमी झाला नसल्याचे आकडेवारी दिसून येत आहे. सामान्य नागरिकांसह अनेक अधिकारी,पोलीस,खेळाडू,नेते कोरोनाचे बळी ठरले आहे.यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र पुत्र आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आज पुण्यात निधन झाले.
कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना नांदेडहून पुण्याला आणण्यात आले होते. अवघे ३४ वर्षे वय असलेले शिंदे हे नुकतेच त्रिपुराहून नांदेड येथे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने प्रथम त्यांच्यावर नांदेड येथे तसेच नंतर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यात आणले गेले होते.
Deeply shocked and saddened by sudden demise of Sudhakar Shinde,IAS,Tripura cadre.
He succumbed to Covid 19 in Nanded. He was one of the finest,gentle & exceptional officer, it's a big loss for the state.
Spoke to his wife to offer my deepest condolences to her & family
Om Shanti pic.twitter.com/RgclZ8F4Am— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) October 9, 2020
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘सुधाकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने त्रिपुराने एक मृदु स्वभावाचा कर्तबगार अधिकारी गमावला आहे. राज्याची आज खूप मोठी हानी झाली आहे’, अशा भावना देव यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. शिंदे यांच्या पत्नीशी संपर्क साधून सांत्वन व्यक्त केल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन सांगितले. दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख चढता असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी दिवसभरात 12 हजार 134 नवे रूग्ण सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- लेखिकेच्या २० तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश, मुजोर ज्वेलर्सने मराठीत मागितली माफी
- …म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला
- मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे; कुणी अपमान करत असेल तर …
- ‘आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
