नगर- ‘आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार’ असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसंच, RTPCR टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत आणल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा अहमदनगर येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी अनलॉकबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
दरम्यान, आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितल. नियम पाळणं खूप महत्वाचं त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 69 लाख जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा ISI च्या संपर्कात होते, NIA चा दावा
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
- छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- भीमा कोरेगाव प्रकरणी NIAने केले आनंद तेलतुंबडे सह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

