नवी दिल्ली- अफगाणिस्तानात पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर भारताचे वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानचं लष्कर आणि तालिबानींच्या संघर्षात मृत्यू झाला आहे. दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. रॉयटर्सनं त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे.
दानिश सिद्दीकी मूळचे दिल्लीतील रहिवाशी होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेतील सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्थानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. सिद्दिकी देखील हीच परिस्थिती कव्हर करण्यासाठी तिथे गेले होते.
दानिश यांची हत्या तालिबानी बंडखोरांनी केल्याचं सांगितलं जात असली तरी आता तालिबानने या हत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. इतकचं नाही तर दानिश यांच्या मृत्यूबद्दल तालिबानने शोकही व्यक्त केलाय. दानिश सिद्दीकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही; पण तो या भागात असल्याची कल्पना आम्हा देण्यात आली नव्हती, असं तालिबानने म्हटलं आहे.
नक्की कोणत्या गोळीबारात भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाला याची आम्हाला माहिती नाही. त्यांचा मृत्यू कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही. युद्ध सुरु असणाऱ्या प्रदेशामध्ये एखादा पत्रकार येत असेल तर त्यासंदर्भातील माहिती आम्हाला दिली पाहिजे. त्या व्यक्तीला काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,” असंही तालिबानने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- टी-२० विश्वचषक! प्रबळ दावेदारच होऊ शकतात पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी


