श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर ही मालिका ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील बदलल्या.
भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला कॅप्टन बनवण्यात आले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शाश्त्री देखील इंग्लंड दौऱ्यावर आहेत त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची निवड केली आहे. या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड झाली आहे यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला देखील संधी देण्यात आली आहे.
दरम्यान श्रीलंका प्रशिक्षक द्रविड यांच्याबाबत सूर्यकुमार यादवने एक मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर द्रविड संघाला प्रशिक्षण कसं देत आहेत, याबाबतही त्याने सांगितले आहे.
द्रविड यांच्याबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, ” राहुल द्रविड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फार अनुभव आहे. तसेच त्यांची शिकवण्याची शैली देखील वेगळी आहे. पण जेव्हा आपण द्रविड यांच्याबरोबर काही गोष्टी बोलायला जातो तेव्हा त्या विचार करून बोलाव्या लागतात कारण त्यांना त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि त्याचबरोबर त्यांच्याजवळ बरेच क्रिकेटपटू असतात. आतापर्यंत बऱ्याच युवा क्रिकेटपटूंना त्यांनी घडवले आहे. त्यामुळे द्रविड यांचासारखे चांगले प्रशिक्षक आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. कारण ते प्रत्येक खेळाडूची मदत करतात, प्रत्येकाचे ऐकून घेततात. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला मानसीकरीत्या ते बळकट करण्याचा प्रयत्न करतात.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा मुंडे नव्हे तर त्यांचे समर्थक नाराज आहेत’, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपटाची शाहरुख खानने केली प्रशंसा, म्हणाला…
- आणखी एक सचिन वाझे ऊर्जा विभागात असल्याचा मनसेचा गंभीर आरोप
- शाह-फडणवीसांची दिल्लीत भेट; सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई होणार ?
- भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांकडून हत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

