Share

फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपटाची शाहरुख खानने केली प्रशंसा, म्हणाला…

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. दरम्यान आता या चित्रपटावर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने देखील रिव्यू दिला आहे. तसेच ‘तुफान’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही कौतुक केले आहे.

अभिनेता शाहरूख खानने ट्विट करत लिहिलं, ‘माझे मित्र फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मेहनतीला माझ्याकडून खूप सारं प्रेम. काही दिवसांपूर्वीच मला हा चित्रपट पहायला मिळाला. परेश रावल, मोहन अगाशे, मृणाल ठाकुर आणि हुसैन दलाल यांचा खूपच शानदार परफॉर्मन्स पहायला मिळाला. माझा रिव्यू- आपल्या सर्वांना ‘तूफान’ सारखे चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’ असे म्हणत त्याने चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

फरहान अख्तर हा या चित्रपटात मुंबईतील डोंगरी भागातील स्थानीक गुंडा अज्जु भाईचे पात्र साकारत आहे. त्याच्या आयुष्यात अनन्याचे प्रेम येताच त्याचे आयुष्य बदलुन जाते. ती त्याला बॉक्सिंग चॅम्पियन बनण्यासाठी ती त्याला तयार करते. गुंडा ते बॉक्सर असा फरहान अख्तरचा हा प्रवास या चित्रपटाद्वारे सादर केला जाणार आहे. अज्जू भाईचा एक निर्णय़ त्याला बॉक्सिंगच्या वर्तुळात आणून सोडतो.

तर फरहानच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेत अभिनेते परेश रावल हे आहेत. तर इतर कलाकारामध्ये सुप्रिया पाठक शाह, हुसैन दलाल यांचा समावेश आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!