Share

‘पंकजा मुंडे नव्हे तर त्यांचे समर्थक नाराज आहेत’, चंद्रकांत पाटील यांची माहिती

Published On: 

मुंबई : गेल्या आठवड्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळालं. यात खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांच्या जागी भागवत कराड यांना स्थान मिळालं. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर बीड, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर नुकतेच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. ‘मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं होतं.’
दरम्यान, खुलासा करूनही पंकजा या राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र, यावर ‘पंकजा मुंडे नव्हे तर त्यांचे समर्थक नाराज आहेत’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ते म्हणाले, मंत्रिपदावरून पंकजा मुंडे नाही, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना योग्य पद मिळावे अशी त्यांची भावना आहे. आणि ती योग्य आहे. पण पंकजा मुंडे यांनी मंत्रिमडळ विस्तारावरून नाराज नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे’.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!