मुंबई : काही दिवसांपूर्वी गृहखात्यात मागच्या दाराने प्रवेश मिळालेल्या सचिन वाझेची प्रकरणे आणि त्याचे वसुलीचे पराक्रम सगळ्या देशाने पाहिले. अशाच प्रकारचा आणखी एक सचिन वाझे ऊर्जा विभागात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
जर महावितरण विभागातील वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर भव्य मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ऊर्जा खात्यातील 'वसुली एजंट' कोण, याबाबतचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस-प्रवक्ते श्री. हेमंत संभूस आणि श्री. संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.https://t.co/ossDltzFwU
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 16, 2021
हा व्यक्ती महावितरणच्या संचालक पदावर नियुक्त आहे. ज्याचं काम कलेक्शन आहे. महाराष्ट्रातून कलेक्शन करुन द्यायचं हे काम आहे. याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याला 15 दिवसांची कोठडी सुद्धा झाली आहे. या व्यक्तीला बडतर्फ करण्यात आले होते आणि अशा व्यक्तीला पुन्हा कसं सेवेत घेतलं जातं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं मनसेने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- टी-२० विश्वचषक! प्रबळ दावेदारच होऊ शकतात पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- स्मार्ट औरंगाबादच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एएससीडीसीएल बोर्डाची मान्यता
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी


