Share

भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांकडून हत्या

Published On: 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची धर्मांध तालिबान्यांनी हत्या केली आहे. दानिश हे रॉयटर्स या न्यूज एजन्सीसाठी काम करत होते. फोटाजर्नलिस्ट म्हणून काम करत असताना अस्वस्थ अफगाणिस्तानातली हिंसा, तालिबानी अतिरेक्यांचा कहर अनेक वेळा कॅमेऱ्यात टिपला होता. अफगाणिस्तानमध्ये उसळलेला हिंसाचार कव्हर करण्यासाठी ते येथे गेले होते. कंधारमधील स्पिन बोल्डन भागात हिंसाचार कव्हर करताना त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममूदे यांनी शुक्रवारी याबाबत त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली. दानिश सिद्दीकी यांनी करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि रॉयटर्ससाठी फोटो जर्नालिस्ट म्हणून ते काम करत होते. दानिश यांनी रोहिंग्या समाजावरील अत्याचाराचं केलेलं कव्हरेज तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित झालं.

दानिश सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून नुकतेच अफगाणिस्तानमधील काही फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते. बेभान झालेल्या गर्दीने त्यांच्या ताफ्यावरही हल्ला केला होता आणि याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता.

जगभरातून त्यांना आदरांजली दिली जात आहे. फोटोग्राफीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे दानिश मोजक्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी भारतात टिपलेले अनेक फोटो गाजले. त्यात दिल्ली दंगलीपासून शेतकरी आंदोलनापर्यंतचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!