🕒 1 min read
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस सबळ पुरावे समोर येत असल्याने वाझेंच्या अडचणीत वाढ होत असून दुसरीकडं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत.
वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असंही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
केंद्रीय गृहविभागाने स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. आता, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे सोपवण्यात आला असून एटीएसच्या हाती देखील मोठे धागेदोरे लागले आहेत. आता, ही केस व सर्व पुरावे एनआयएकडे सोपवण्यात यावा असं ठाणे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.
दरम्यान या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची लढाई सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डीला अटक का केली नाही ? फक्त थातुरमातुर बदलीचे नाटक का ?
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
