चाळीसगाव – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. महाविकास आघाडी सरकार श्रीमंत, कारखानदारांना वीज वापरासाठी सवलत देत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मात्र वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.
लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. यातच काल शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्याप्रकरणी जळगावात भाजपा आमदाराने वीज कंपनीचे अभियंता फारूख शेख यांना दोरीने बांधल्याची घटना घडली.
चाळीसगावचे आमदार भाजपा आमदार मंगेश चव्हाण आपल्या समर्थकांसह अभियंत्याच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी वीज तोडणीचा जाब विचारला. दरम्यान,शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाची तक्रार संबंधित अभियंत्याने पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक मुंडे हे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि त्यांनी आमदार चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे त्याविरोधात आम्ही येथे आलो आहोत. पाणी दोन दिवसांत जोडलं गेलं नाही तर हातातोंडाशी आलेलं पीक जाऊ शकतं. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं – मंगेश चव्हाण
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

