Share

फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे

Published On: 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे. सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला या भाजपाच्या एजंट म्हणून काम करत होत्या असा आरोप केला होता. यावर आता भाजप नेते निलेश राणेंनी आव्हाडांवर टीका केली आहे, ‘जितेंद्र आव्हाड कोणाचे एजेन्ट आहेत?’ असा प्रतिप्रश्न करत आव्हाडांवर टीका केली. पुढे ते म्हणाले ‘जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का बोलायचा. घरात इंजिनीरला खेचून आणून मारणारे हे मंत्री आहेत ‘ असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला आहे.

पुढे राणे म्हणाले कि, ‘पुरावा दिलाय का काय? तुम्ही एका महिलेवर आरोप करत आहात. कुठून, कशाच्या आधारावर तुम्ही आरोप करत आहात. मी काल पासून हे बघतोय त्यांनी असं केलय त्यांनी तसं केल, आधार काय जितेंद्र आव्हाडाचा. कशामुळे ते हे सर्व बोलतायेत, तर ते आता मंत्री आहेत, फुकटात मंत्रिपद मिळालय कुठे तरी आपली वळवळ असली पाहिजे म्हणून ती वळवळ आहे. त्याच्यापलीकडे जाऊन त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीचा पुरावा नसतो. हि फुकटची त्यांची वळवळ आहे बाकी काही नाही.’ असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला आहे.

माध्यमांनी त्यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणी मुख्य सुत्रधाराला सोडून दिले जात आहे का असा प्रश्न केला असता ते म्हणाले कि, मनसुख हिरेन यांच्या हत्येत वाझे हे मुख्य आरोपी आहेत हे NIA आणि ATS ने सांगितले आहे. मनसुख हिरेन हत्या का झाली? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाजूला जिलेटीनने भरलेली गाडी का उभी केली? ते आता NIA च्या तपासात येईल अस ते म्हणाले. आणि हे सर्व प्रकरण शिजवतय कोण? यांचे धागे दोरे कलानगरच्या बंगल्या पर्यंत जातील असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!