मुंबई : महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. आज राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
कधीकाळी ३६ हजार ही संख्या अख्ख्या देशभरातील नव्या कोरोनाग्रस्तांची असायची. मात्र आता ती एकट्या महाराष्ट्रात नोंदवली जाऊ लागली आहे. पुण्यातील याच कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला पाहता पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर अजित पवार यांनी तूर्तास पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळले नाही तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. तर ३१ मार्च पर्यंत बंद असलेल्या शाळा आता ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान,कोरोनाची हीच परिस्थिती लक्षात घेता, राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच सणांच्या पार्श्वभूमीवरही अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

