Share

पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला

Published On: 

पुणे : इंग्लंडविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बॅट्समन्ससमोर अक्षरश: लोटांगण घातले. इतकी वाईट स्थिती असताना देखील टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सहावा बॉलर म्हणून मैदानात उतरवले नाही. हार्दिकने दुसर्‍या वनडेम+ध्ये बॉलिंग केली नाही.हार्दिक पंड्या टी -२० मालिकेत बॉलिंग झाली. पण कोहलीने दुसर्‍या वनडेत त्याला बॉलिंग दिली नाही. कोहली म्हणाला की, पुढील व्यस्त वेळापत्रक पाहता अष्टपैलू खेळाडू फिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोहली म्हणाला, ‘आम्हाला त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आम्हाला त्यांची कौशल्ये कोठे आहेत ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. टी -२० मध्ये त्याचा गोलंदाजीचा उपयोग झाला होता. पण एकदिवसीय सामन्यात त्याचा कार्यभार व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आम्हाला इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे पांड्या फीट असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे.’

कोहलीच्या या प्रतिक्रियेनंतर विरेंद्र सेहवागने Cricbuzz बोलताना  स्पष्ट मत मांडत म्हटलं आहे की, “भारत पुढील काही महिने कोणतेही सामने खेळणार नसताना फक्त हार्दिक पांड्याचा वर्कलोड सांभाळण्यासाठी एकदिवसीय मालिक गमावणं योग्य नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याने चार ते पाच ओव्हर टाकणं अपेक्षित आहे”. सेहवागने यावेळी ५० ओव्हर्समुळे थकवा येतो हे मान्य केलं आहे. पण पाच ते सहा ओव्हर टाकल्याने जास्त काही फरक पडत नाही असंही सांगितलं आहे.

“भारत पुढील काही महिने कोणताही सामना किंवा मालिका खेळणार नाही आहे. आपल्याकडे फक्त आता आयपीएलच आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की हार्दिक पांड्याचा वर्कलोड सांभाळण्यासाठी एकदिवसीय मालिकेत पराभव झाल्याने काही फरक पडत नाही. जर त्याच्या वर्कलोडमध्ये चार ते पाच ओव्हर समाविष्ट नसतील तर हे चुकीचं आहे. भारत प्रत्येक गोलंदाजाचा वर्कलोड सांभाळण्याचा प्रयत्न करत असून हार्दिकसाठी तोच नियम असल्याचं तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे,” असं सेहवागने म्हटलं आहे.

“हार्दिक पांड्याने दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर जास्त क्रिकेट खेळलेलं नाही. मला माहिती नाही हार्दिक पांड्याचा वर्कलोड खूप वाढला असल्याचं कोण ठरवत आहे. सर्जरी झाल्यापासून तो जास्त क्रिकेट खेळलेला नाही. कसोटीमध्ये तो नव्हता, टी-२० खेळला आणि तिथेही दोन तीन सामन्यात गोलंदाजी केली. याचा अर्थ त्याने काहीच लोड घेतलेला नाही. जर तो सतत आणि प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळत असेल तर मी समजू शकतो. पण त्याने सध्या तीन ते चार टी-२० सामन्यात चार-चार ओव्हर्स टाकल्या आहेत. कदाचित त्याने आयपीएलआधी कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून सामन्यात गोलंदाजीपासून ब्रेक मागितला असल्याचीही शक्यता आहे,” असंही सेहवागने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!