मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी बुधवारी चांदीवाल आयोगासमोर उपस्थित झाले. दोघांनीही प्रतिज्ञापत्र सादर करत जबाब नोंदवला आहे. यात प्रतिज्ञापत्रात सचिन वाझेंनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, त्यांनी अनिल देशमुखांच्या सांगण्यावरूनचं वाझेने मुंबईत बार मालकांकडून पैसे वसुल केले. पुढे वाझे म्हणाले की, अनिल देशमुखांनी त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अनिल देशमुखांनी माझ्यावर आणि परमवीर सिंहावर खंडणीचे खोटे आरोप लावले असल्याचा आरोप ही त्यांनी अनिल देशमुखांवर केला.
काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनी ईडीला जबाब दिला होता. त्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १६ वर्षांच्या निलंबनानंतर मुंबई पोलिसात पुन्हा रुजू करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली होती, असा दावा सचिन वाझे यांनी ईडीच्या जबाबात केला आहे होता. त्यात अजून एका वक्तव्याची भर पडली आहे.
त्याशिवाय ३ फेब्रुवारीला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी धक्कादायक खुलासा केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी सचिन वाझेला पुन्हा कामावर घेतले होतं, असा खुलासा त्यांनी ईडीला २ फेब्रुवारीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
