Share

‘मोदी माफी मागा अन्यथा…’; नाना पटोलेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: संसदेत पंतप्रधान मोदींनी (PM Modi Speech) काँग्रेसवर मजुरांना तिकीटं काढून देऊन कोरोनाचा (Corona) वाढवल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यातले काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान केल्या प्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची मोठी फौज तिथे दिसून आली. नाना पटोले म्हणाले कोरोनाकाळात केंद्र सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते.

कोरोनाचा शिरकाव झाल्याबरोबर देशाच्या सीमा सील करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या असतानाही नमस्ते ट्रम्पसाठी मोदींनी त्याला विलंब केला. मुंबईत येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली असता त्यालाही विलंब केला. मोदींच्या नाकर्तेपणामुळेच देशात कोरोना वाढला पण त्याचे खापर मात्र ते आज दुसऱ्यावर फोडत आहेत. पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!