नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेरोजगारीचा मुद्दा चर्चेत घेतला गेला. केंद्र सरकारने राज्यसभेला उद्देशून बेरोजगारी संबंधी एक माहिती प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी २०१८ ते २०२० वर्षात २५ हजार भारतीयांनी बेकारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सादर केली. त्यात ९,१४० नागरिकांनी बेकारीला कंटाळून आत्महत्या केल्या तर १६,०९१ नागरिकांनी कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) ने ही माहिती दिल्याचे राय यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार वर्ष २०२० या कोरोना वर्षामध्ये बेरोजगरांच्या आत्महत्या सर्वात उच्चांक गाठत ३,५४८ वर पोहोचल्या. २०१८ साली २,७४१ नागरिकांनी बेकारीला कंटाळत आत्महत्या केल्या तर हा आकडा २०१९ साली २,८५१ होता. राय यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार तरुणांना मानसिक आरोग्य आणि बेकारीवर काम करण्यास बळ देत आहे असे वक्तव्य केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना पंतप्रधानांनी देशात गेल्या वर्षी २७ लाख रोजगार निर्माण केल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी देशात गेल्या ५० वर्षात नव्हती एवढी बेकारी आज पहायला मिळते असे म्हंटले होते. UPA सरकार मध्ये आम्ही १० वर्षात २७ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले होते तर NDA सरकारने २३ कोटी लोकांना पुन्हा गरिबीत ढकलले. असे राहुल गांधी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अभाविपचे ‘विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन’
- Amaravati : शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला म्हणून महापालिका आयुक्तांवर शाई फेक
- ‘केंद्रातलंही सरकार आम्ही ताब्यात घेऊ’; नवाब मलिकांचा इशारा
- शरद पवार, दानवे, कोल्हे या नेत्यांची दिल्लीत भेट; चर्चेला उधाण
- राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”


