मुंबई: ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगरचा यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये नवीन वादळ सुरु झाले आहे. त्याच्यावर अनेक माजी खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर उघडपणे टीका केली आहे. लँगरच्या जाण्यामागे पॅट कमिन्सचा सुद्धा वाट आहे असे सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे कर्णधार कमिन्ससुद्धा वादात अडकला आहे.
आपल्यावर लावलेल्या आरोपांवर शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने (pat cummins) खुलासा केला आहे. त्याने या संबधी एक निवेदन दिले आहे. ज्यात तो म्हणाला ” “जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर बरीच सार्वजनिक प्रतिक्रिया येत आहेत. तीही चांगल्या कारणास्तव, मी या आधी याविषयी सार्वजनिक टिप्पणी केली नव्हती. आता जस्टिनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि स्वतःच्या सार्वजनिक टिप्पण्या दिल्या आहेत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुद्धा. आता मीही काही स्पष्टता देऊ शकतो,” तो पुढे म्हणाला.
Pat Cummins' statement on Justin Langer's resignation ⬇️ pic.twitter.com/a5scaqjQ7X
— 7Cricket (@7Cricket) February 9, 2022
आपल्या निवेदनात पॅट कमिन्सने पुढे लिहले “जस्टिनने कबूल केले की त्याची प्रशिक्षक म्हणून शैली तीव्र होती, त्याने त्याच्या तीव्रतेबद्दल खेळाडू आणि कर्मचार्यांची माफी मागितली. ती अनावश्यक होती. त्याची तीव्रता हा मुद्दा खादीच नव्हता. ऑस्ट्रेलियाचे चांगले खेळाडू होण्यासाठी या नवीन शैलीचे प्रशिक्षण आणि कौशल्य संघासाठी आवश्यक आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेळाडूंनी दिलेला हा फीडबॅक होता आणि सपोर्ट स्टाफनेही दिलेला हा फीडबॅक मला समजतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेला हा निर्णय मला योग्य वाटतो. मी दिलेली जबाबदारी गांभीर्याने घेतो” पॅट कमिन्सने दिलेले प्रतिउत्तरातील निवेदन ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये होणाऱ्या त्याच्याबद्दल गैरसमजाला थांबवण्यासाठी होते.
महत्वाच्या बातम्या
- “कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी…”; चंद्रकांत पाटलांचा त्या वक्तव्यावरून घूमजाव
- IPL 2022: “मुंबई ईशान किशनला विकत घेण्यासाठी सगळे प्रयत्न करेल”; आकाश चोप्राचा ठोस दावा
- ‘मोदीजी ‘पीएम केअर फंड’ गेला कुठे?’ राष्ट्रवादीचा सवाल
- शिवप्रेमी नाराज असल्याने घडला प्रकार – नवनीत राणा
- २००८ मध्ये धोनीच्या निवडीबाबत ऑक्शनर रिचर्ड मेडलीने केला खुलासा


