Share

नितेश राणे यांना जामीन मंजूर, मात्र कणकवलीत प्रवेश बंदी

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग: शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी भोवऱ्यात सापडलेले भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांचा जामीन मंजूर झाला (Finally Nitesh Rane bail granted)आहे. त्यांच्या जमीन मंजूरानंतर कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

प्रकृती ठीक नसल्याने नितेश राणे यांना काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रात्री तीन वाजल्यापासून त्यांना उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितेश राणे यांना जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने त्यांच्यावर अट घातली आहे. नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या दोघांनाही ओरोस पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय तपास कामात पोलिसांना गरज भासल्यास सहकार्य करायचे आहे. असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!