🕒 1 min read
नांदेड : विदर्भ सीमेवर असलेल्या धनोडा येथील ६ किलोमीटरच्या नविन जलवाहिनीचे काम पुर्ण होउन कार्यन्वीत न झाल्याने माहूर शहराला महिन्यात केवळ चार वेळाच पाणी मिळत आहे. प्रसिद्ध तिर्थस्थळ असलेले माहूर येथे पाण्याची योजनेचे काम पुर्ण झाले मात्र केवळ पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी न बसवल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
माहुर येथील भाविक व नागरिकांना मुबलक पाणिपुरवठा करण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधी अंतर्गत विदर्भ सिमेवर असलेल्या धनोडा येथून ६ किलोमीटर नवीन जलवाहिनीचे काम पुर्ण होऊन आठ महिने पुर्ण झाले तरिही जलवाहिनी कार्यन्वित न केल्यामुळे येथील नागरिकांना महिन्यातून चारच वेळा पाणी मिळते. यामुळे माहूरकर अजुनही तहानलेलेच आहेत.
येथील काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी माहूर नगरपंचायतीकडे अनेक वेळा यांसदर्भात निवेदन दिले आणि नागरिकांना पाणिपुरवठा नियमित करावा अशी मागणी केली. परंतु प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही मिळाला नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी मागणी केली होती. यात जुनी जलवाहिनी जिर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागते. त्यामुळे उपसा करणाऱ्या मोटारी जळत असतात. यामुळे अनेकदा पाणीप्रश्न उपस्थित होतो.
महत्वाच्या बातम्या
- माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
- लँड रोव्हरची शानदार डिफेंडर V8 लाँच; जाणून घ्या खास फीचर्स !
- मोठी बातमी : ९ मार्च रोजीचा मनसेचा वर्धापनदिन सोहळा रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
