नवी दिल्ली : सध्या बाजारात कार्स च्या नवनवीन व्हर्जन येत आहेत. सध्या कोरोना काळात मंदावलेला वाहन उद्योगाने जोर धरला आहे. तर आता प्रदूषण आणि वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांकडे काल वाढला आहे. तर प्रदूषण टाळण्यासाठी सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देखील देत आहे.
दरम्यान, लँड रोव्हरने नवीन डिफेंडर व्ही 8 जागतिक स्तरावर लाँच केली आहे. ही कार नार्विक ब्लँक रूफसह ग्रे पेंट शेडमध्ये सादर करण्यात आली आहे. या मॉडेल्समध्ये सॅटिन ब्लॅक हेडलाइट्स आणि क्सीनन ब्लू ब्रेक कॅलिपरदेखील आहेत जे वाहनास स्पोर्टी लुक देतात. नवीन लँड रोव्हर डिफेंडर व्ही 8 मध्ये 5.0-लीटर, व्ही 8 मोटर आहे जी 511 बीएचपी आणि 625 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ताशी 240 कि.मी. वेगाने धावू शकते, तसेच 5.6 सेकंदात ही कार तीन अंकी (ट्रिपल डिजीट) वेग घेऊ शकते
PHEV P400e हे भारतात लाँच केलेले शेवटचे डिफेन्डर मॉडेल होते जे 2.0 लिटर, फोर सिलेंडर, बीएस 6 पेट्रोल इंजिनवर चालते, हे इंजिन 383 बीएचपी आणि 640 एनएम टॉर्कचे हायब्रिड पॉवरट्रेन तयार करते. पॉवरट्रेन टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशनशी जोडले जाते, जे लँड रोव्हरच्या लेटेस्ट टेरेन रिस्पॉन्स फॉर व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणालीद्वारे सर्व चार चाकांना शक्ती देते. PHEV लँड रोव्हर डिफेन्डर 5.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. नवीन डिफेंडर V8 मॉडेलमध्ये आतील बाजूस ऑल-ब्लॅक फिनिशिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे त्याचा लूक जबरदस्त आहे. तर इतर सर्व फीचर्स काही स्टँडर्ड मॉडेलशी सुसंगत आहेत.
लँड रोव्हरने एलईडी बॉक्स आणि बॉक्सी सिल्हूट टिकवून ठेवणाऱ्या टेललाईट्समध्ये अॅल्युमिनियमच्या कास्टिंगसह अनेक फीचर्स जोडले आहेत. टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टम अॅडजस्ट करण्यासाठी कॉन्फिगर केली जाऊ शकते आणि ऑफ-रोडवर जात असताना स्वयंचलितपणे 145 मिमी पर्यंत वाढते. या कारच्या इंप्रेशन आणि इगोरमेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी न्यूमेटिक सस्पेन्शन ग्राउंड क्लियरन्स कमी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या SUV मध्ये जास्तीत जास्त 900 मिमी डेप्थ असेल या कारची किंमत अमेरिकेत सुमारे 108,000 डॉलर्स इतकी ठेवली आहे. ज्याची किंमत भारतातील सुमारे 78 लाख रुपये इतकी आहे.
सध्या लँड रोव्हर डिफेंडरचे S, SE, HSE आणि फर्स्ट एडिशन ट्रिम विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिफेंडर 90 आणि डिझेल इंजिन लवकरच भारतात दाखल होऊ शकते. युरो NCAP ने सांगितले की, सुरक्षिततेसंबंधित चाचणी 2020 मध्ये विकल्या गेलेल्या सर्व डिफेन्डर्सना लागू आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही ग्राहकांसाठी ही चांगली बातमी आहे. यामध्ये तुम्हाला सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, लोड लिमिटर्स, ISOFIX टीथर आणि एअरबॅग कट ऑफ स्विच देण्यात आले आहेत. वाहनात आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम, रियर कॉलिसन मिरर आणि लेन कीप असिस्ट असे फीचर्स दिले आहेत. जेव्हा कार अचानक कोणत्याही गोष्टीवर आदळते तेव्हा ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम काम करते.
महत्वाच्या बातम्या
- प. बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी मंत्र्याने केला भाजपात प्रवेश, 76 नेते ममतांची साथ सोडण्याच्या तयारीत
- विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- ‘कायदा सर्वोच्च, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे’ तापसीच्या प्रियकराला केंद्रीय क्रीडा मंत्र्याचं प्रतिउत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

